कर्करोग रुग्णांसाठी श्री साईनाथ रुग्णालयात मोफत हाडांची घनता तपासणी शिबिर..*
शिर्डी (प्रतिनिधी)-- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने कर्करोग रुग्णांसाठी विशेष मोफत हाडांची घनता (Bone Mineral Density - BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्करोगावरील उपचारा दरम्यान, विशेषतः हार्मोनल थेरपी व केमोथेरपीमुळे हाडांची घनता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन फॅक्चरचा धोका वाढू शकतो. हा धोका वेळीच ओळखून योग्य उपचार व प्रतिबंधात्मक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरामध्ये BMD (Bone Mineral Density) तपासणीद्वारे हाडांची घनता तपासणे, हाडे ठिसूळ होण्याचा धोका लवकर ओळखणे, योग्य उपचार व प्रतिबंधात्मक सल्ला देणे तसेच हाडांचे आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ कर्करोग तसेच हार्मोनल थेरपी किंवा केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांना घेता येणार आहे. शिबिरासाठी नोंदणी पूर्णपणे मोफत असून, नोंदणीसाठी आधारकार्ड, लागू अ...