112 वर खोटा कॉल केला श्रीरामपुरात गुन्हा दाखल...
दिलीप लोखंडे
टाकळीभान प्रतिनिधी -श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर गावातील ग्रामस्थ दादासाहेब संजय शिंदे याने दारूच्या नशेत सार्वजनिक ठिकाणी शिवीगाळ, आरडाओरडा केला.
तसेच 112 या पोलीस सहायता क्रमांकावर खोटा कॉल करून या यंत्रणेच्या कामकाजात सुविधा निर्माण केली आणि कर्तव्यावरील पोलिसाशी हुज्जत घातली म्हणून पोलीस शिपाई उंडे यांच्या फिर्यादीवरून दादासाहेब विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुका पोलीस निरीक्षक श्री. धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार बाबर पुढील तपास करीत आहेत.
Comments
Post a Comment