शेतकरी संघटनेचा दणका, नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या खाती अवकाळी अनूदान जमा



टाकळीभान प्रतिनिधी : शेतकरी संघटनेने रब्बीच्या अवकाळी अनुदाना संदर्भात आंदोलनाचा इशारा दिला होता. इशारा देताच नेवासा तालुक्यातील शेतकर्यांच्या खाती अनुदान जमा झाले आहे.

४ ऑगस्ट २०२६ रोजी शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष, विधी तज्ञ ड. अजित काळे यांचे नेतृत्वाखाली नेवासा तहसील कार्यालयाचे तहसीलदार संजय बिराजदार यांची शेतकरी संघटनेचे नेवासा तालुका पदाधिकारी यांनी भेट घेवून मार्च २०२६ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे कांदा गहू हरभरा या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते त्यानंतर सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते पंचनामे होऊन देखील शेतकऱ्यांना अनुदानाचे पैसे मिळाले नसल्याचे निदर्शनास आणून दिले. तरी लवकरात लवकर शेतकर्यांच्या खाती अनूदानाची रक्कम जमा करण्याची मागणी केली असता तहसीलदारांनी त्याची दखल

खात्यावर घेऊन शेतकऱ्यांच्या अनुदानाची रक्कम जमा करण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा झाल्यामुळे शेतकरी वर्गातून नेवासा तालुका शेतकरी संघटनेचे व तहसीलदार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. विशेष करून शेतकरी संघटनेचे राज्याचे उपाध्यक्ष ड अजित काळे यांच्या नेहमीच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांना वेळोवेळी पिक विमा तसेच अनुदान मिळत आहे. अनुदान मिळून देण्यासाठी नेवासा तालुका शेतकरी संघटना अध्यक्ष मेजर अशोक काळे, हरी अप्पा तूवर, बाबासाहेब नागोडे, युवा आघाडी अध्यक्ष रोहित कुलकर्णी, बंडोपंत चौगुले, कार्ल साठे,किरण लंघे , बापूसाहेब देशमुख, दिलीप पोटे, गणेश गोरे, विजय गायकवाड, दादासाहेब नाबदे, ड बाळासाहेब कावळे, ज्ञानेश्वर शिरसाठ, सागर सागडे, दत्तू निकम, अनिल साळुंखे, डॉ. माकोणे, अशोकराव नागवडे, खंडेराव सरोदे, वसंतराव शेरकर इत्यादींनी विशेष प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध