प्रतिकूल परिस्थितीवर मात करत डॉ. सुहास सदाफळ यांची रसायनशास्त्र विषयात पीएच.डी.जिद्द, संघर्ष अन् यशाची भरारी!
शिर्डी ( प्रतिनिधी)-
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर डॉ. सुहास वैशाली अशोक सदाफळ यांनी एमजीएम विद्यापीठातून रसायनशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशामुळे सदाफळ कुटुंबासह कोपरगाव परिसराचा शैक्षणिक क्षेत्रात गौरव वाढला आहे.
अनेक अडचणींचा सामना करत असतानाही डॉ. सुहास सदाफळ यांनी शिक्षणाची वाट सोडली नाही. प्रतिकूल परिस्थितीला न जुमानता त्यांनी सातत्याने मेहनत घेतली आणि आपल्या जिद्द, आत्मविश्वास व चिकाटीच्या जोरावर पीएच.डी. पदवी संपादन केली. त्यांचा हा संघर्षमय शैक्षणिक प्रवास विद्यार्थ्यांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे.
त्यांच्या संशोधन कार्यासाठी मार्गदर्शक डॉ. गवई जे. जी. तसेच सहमार्गदर्शक डॉ. सपकाळ एस. बी. यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. मजगे सर व डॉ. शिंगारे सर यांचेही मार्गदर्शन मिळाले.
पीएच.डी. पदवी संपादन केल्याबद्दल एमजीएम विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. विलास एस. सपकाळ आणि डॉ. प्राप्ती देशमुख यांच्या हस्ते डॉ. सुहास सदाफळ यांचा सत्कार करण्यात आला. तसेच प्राचार्य डॉ. विजया मुसांडे यांनीही त्यांचा सत्कार करून अभिनंदन केले.डॉ. सुहास सदाफळ यांनी एस एस जी एम कॉलेज कोपरगाव येथून रसायन शास्त्राची पदवी संपादन करून पुणे येथे रसायन कंपनीत कार्यरत होते कार्यरत होते.
डॉ. सुहास सदाफळ यांचे लहान बंधू डॉ. संदिप सदाफळ यांनीही कॅनडा येथून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे.परदेशातील उच्च शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी कोपरगाव येथे रसायन उद्योगाची स्थापना करून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.उच्च शिक्षणाचा उपयोग केवळ स्वतःच्या प्रगतीसाठी न करता आपल्या परिसराच्या विकासासाठी आणि रोजगारनिर्मितीसाठी कसा करता येतो, याचा आदर्श सदाफळ बंधूंनी निर्माण केला आहे.एका बाजूला अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण पूर्ण करून पीएच.डी. पदवी संपादन करणारे डॉ. सुहास सदाफळ, तर दुसऱ्या बाजूला कॅनडातून उच्च शिक्षण घेऊन कोपरगावात उद्योग उभारून रोजगारनिर्मिती करणारे डॉ. संदिप सदाफळ या दोन्ही बंधूंची यशोगाथा परिसरातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
Comments
Post a Comment