शिर्डीत दि.13 ते 20 ऑगस्ट या कालावधीत श्री साई सतचरित्र पारायण सोहळा! विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन!

शिर्डी (प्रतिनिधी)-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने गुरुवार दिनांक १३ ऑगस्‍ट, २०२६ ते गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट २०२६ या कालावधीत साईआश्रम भक्‍तनिवास येथील शताब्‍दी मंडपात श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करणेत आले असून या सोहळ्या दरम्‍यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम पार पडणार आहेत.

 श्रावणमासा निमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षीही श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हजारो पारायण वाचकांच्‍या उपस्थितीत साजरा करण्‍यात येणार आहे. या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून, सर्व सांस्‍कृतिक कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. पारायण सोहळ्याचे हे ३२ वे वर्ष असून सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत (पुरुष वाचक) व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत (महिला वाचक) यांचे श्री साईसच्‍चरित पारायण वाचन होईल. 
 प्रथम दिवशी दिनांक १३ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची पारायण मंडपापर्यंत मिरवणूक काढणेत येईल, मिरवणूक पारायण मंडपात पोहचल्‍यानंतर तेथे ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. सकाळी १०.०० ते ११.३० यावेळेत ब्राम्‍हण एकता मंच, शिर्डी यांचे विष्‍णु सहस्‍त्रनाम पठण कार्यक्रम, दुपारी ०१.०० ते ०३.०० यावेळेत श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदीर, शिर्डी शाळेच्‍या विद्यार्थीनींचा सांस्‍कृतिक कार्यक्रम, दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत श्री साईबाबा इंग्‍लीश मिडीयम स्‍कुल, शिर्डी (प्राथमिक विभाग) सांस्‍कृतिक कार्यक्रम, सायं. ०५.०० ते ०६.०० यावेळेत प्रा. श्री. सुनिल कांडेकर सर यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा व रात्रौ. ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. कु. ओंकार महाराज बोचरे, निमगाव श्री ज्ञानेश्‍वर महाराज मंदीर, निमगाव को-हाळे, यांचे किर्तन गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. दि. १४ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०१.०० ते ०२.०० यावेळेत श्री दिगंबर कुलकर्णी संस्‍थान पुजारी यांचे प्रवचन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. सायं.०५.०० ते ६.०० यावेळेत महिला पारायणार्थींसाठी हळदी कुंकू समारंभ व सायं. ६.०० ते रात्रौ ९.३० (धुप आरतीची वेळ सायं ०६.५५ ते ०७.३० वगळून) या वेळेत श्री साईबाबा शिक्षण प्रसारक मंडळाचे आदर्श बाल, प्राथमिक, माध्‍यमिक व आदर्श इंग्लिश मिडीयम स्‍कुल, शिर्डी शाळेचा सांस्‍कृतिक कार्यक्रम श्री साईआश्रम पारायण मंडप येथे होईल. तर, रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. सुजाताताई पाटील, नांदेड यांचा कीर्तन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. दि. १५ ऑगस्‍ट रोजी सायं ०५.०० ते ०६.०० यावेळेत शाहिर श्री किशोर सासवडे मंदीर विभाग कर्मचारी यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा व रात्रौ. ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. श्री परमेश्‍वर महाराज शहापुरकर, नांदेड यांचा कीर्तन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. दि. १६ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत साई स्‍वराधना ग्रुप, मालाड वेस्‍ट, श्री संदिप बा साबळे यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम तसेच सायं.०५.०० ते ०६.०० यावेळेत श्री अमित देशमुख, संस्‍थान पुजारी यांचा श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन सेवा तर रात्रौ.०७.३० ते रात्रौ.०९.३० यावेळेत ह.भ.प.श्री. लहू महाराज कराळे, परभणी यांचे कीर्तन होईल. दि. १७ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११.३५ ते ११.४५ यावेळेत पुरुष वाचकांसाठी तर सायं. ०५.३५ ते ०५.४५ यावेळेत महिला वाचकांसाठी डॉ. श्राी नचिकेत वर्पे, शिर्डी यांचे रक्‍तक्षय (Anaemia), मधुमेह (Diabetes) व आहार - विहार विषयक व्‍याख्‍यान श्री साईआश्रम पारायण मंडप येथे होईल. दुपारी ०१.०० ते ०२.०० यावेळेत श्री गोरक्षनाथ नलगे, संस्‍थान प्र. विधी अधिकारी यांचे श्री साई चरीत्र ग्रंथ प्रवचन कार्यक्रम, सायं.५.०० ते ६.०० यावेळेत सौ. आशाबाई भानुदास गोंदकर, शिर्डी यांचे प्रवचन कार्यक्रम व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह. भ. प. कु. कृष्‍णा महाराज हजारे, यांचा कीर्तन कार्यक्रम होईल. दि. १८ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०२.०० ते ०३.०० यावेळेत प्रा. डॉ. सुनिता वडीतके, प्राध्‍यापिका सिनियर कॉलेज, शिर्डी यांचा प्रवचन कार्यक्रम व सायं.०७.३० ते रात्रौ ०९.३० यावेळेत ह. भ. प. हर्षद महाराज खैरनार, सिन्‍नर जि. नाशिक यांचा कीर्तन कार्यक्रम होईल. दि. १९ ऑगस्‍ट रोजी सकाळी ११.०० ते १२.०० यावेळेत पुरुष पारायणार्थीकरिता तर, सायं. ०५.०० ते ०६.०० यावेळेत महिला पारायणार्थीकरिता श्री साईसच्‍चरित्र पारायण परीक्षा पारायण मंडप येथे पार पडेल. दुपारी ०२.०० ते ०३.०० यावेळेत प्रा. डॉ. सोनाली हरदास, प्राध्‍यापिका, सिनिअर कॉलेज, शिर्डी यांचे प्रवचन कार्यक्रम, दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत ह.भ.प. सेवक साईदास महाराज हासे, श्री क्षेत्र इंदोरी यांचे प्रवचन कार्यक्रम व सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. श्री रमेश महाराज क्षिरसागर, परभणी यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल.
तर गुरुवार दिनांक २० ऑगस्‍ट रोजी सकाळी ०७.०० ते ०८.०० यावेळेत पुरुष वाचक व सकाळी ०९.०० वाजता महिला वाचक यांची अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती होणार आहे. त्‍यानंतर सकाळी १०.३० ते ११.३० यावेळेत दि. १९ ऑगस्‍ट रोजी घेण्‍यात आलेल्‍या श्री साईसच्‍चरित्र पारायण परीक्षेचा निकाल जाहीर करण्‍यात येवून विजेत्‍यांना मान्‍यवारांच्‍या हस्‍ते बक्षीस वितरण करण्‍यात येईल. दुपारी ०२.०० वाजता गावातुन श्री साईसच्‍चरीत्र ग्रंथ (पोथी) मिरवणुक होईल. मिरवणूक परत आल्‍यानंतर वीणा पूजन होईल. तर दुपारी ०२.००ते ०३.०० यावेळेत श्री वसंत वाणी सर श्री साईबाबा कन्‍या विद्या मंदीर, शिर्डी यांचे प्रवचन कार्यक्रम तर, रात्रौ. ०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. श्री रामनाथ महाराज शास्‍त्री यांचे किर्तन कार्यक्रम गेट क्र. ३ समोरील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होईल. 
दि. २१ ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत पारायण मंडपात ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्‍हापुर यांचे गोपाळकाला कीर्तन व त्‍यानंतर दुपारी १२.३० ते ०४.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे. तर, सायं.०७.३० ते ०९.३० यावेळेत ह.भ.प. सौ. राधिका कालेकर, कोल्‍हापुर यांचे भारुड कार्यक्रम होईल.
पारायण मंडपात सकाळी ७.०० ते ११.३० यावेळेत पारायणाच्‍या वेळी फक्‍त पुरुषच पारायण करतील व दुपारी ०१.०० ते ०५.३० यावेळेत फक्‍त महिलाच पारायण करतील. पारायणासाठी वाचकांनी ग्रंथ, श्रीफळ आणि बस्कर स्वत: आणावयाचे असून शालेय विद्यार्थी व १८ वर्षाच्या आतील वाचकांना प्रवेश दिला जाणार नाही. या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त साईभक्‍त व ग्रामस्‍थांनी सहभागी व्‍हावे असे आवाहन श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी, नाट्य रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या वतीने करण्‍यात आले.  
 हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीचे अध्‍यक्ष तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश शिवाजीराव कचरे, समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ. पंकज आशिया (भा.प्र.से.), मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) व उप कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख, नाटय रसिक मंचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्‍थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध