कर्करोग रुग्णांसाठी श्री साईनाथ रुग्णालयात मोफत हाडांची घनता तपासणी शिबिर..*




शिर्डी (प्रतिनिधी)-- श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने कर्करोग रुग्णांसाठी विशेष मोफत हाडांची घनता (Bone Mineral Density - BMD) तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर शनिवार, दि. १५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम), शिर्डी येथे आयोजित करण्यात आले आहे. कर्करोगावरील उपचारा दरम्यान, विशेषतः हार्मोनल थेरपी व केमोथेरपीमुळे हाडांची घनता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन फॅक्चरचा धोका वाढू शकतो. हा धोका वेळीच ओळखून योग्य उपचार व प्रतिबंधात्मक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 शिबिरामध्ये BMD (Bone Mineral Density) तपासणीद्वारे हाडांची घनता तपासणे, हाडे ठिसूळ होण्याचा धोका लवकर ओळखणे, योग्य उपचार व प्रतिबंधात्मक सल्ला देणे तसेच हाडांचे आरोग्य जपण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या शिबिराचा लाभ कर्करोग तसेच हार्मोनल थेरपी किंवा केमोथेरपी घेत असलेल्या रुग्णांना घेता येणार आहे. शिबिरासाठी नोंदणी पूर्णपणे मोफत असून, नोंदणीसाठी आधारकार्ड, लागू असल्यास अपंग प्रमाणपत्र (UID) आणि दोन पासपोर्ट आकाराचे फोटो आवश्यक आहेत.
रुग्णांनी या विशेष आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या वतीने करण्यात आले आहे. नोंदणी व अधिक माहितीसाठी ०२४२३-२५८५५५ लवकर नोंदणी करण्याचे आवाहन आले आहे. जागा मर्यादित असल्याचेही म्हटले आहे.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध