देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

टाकळीभान( प्रतिनिधी ) 
 श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथील न्यू इंग्लिश स्कूल अण्णासाहेब पाटील कनिष्ठ महाविद्यालय शिक्षण घेतलेल्या मेजर ज्ञानेश्वर माळी यांनी एकवीस वर्षाची प्रदीर्घ देशी सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झाल्यानंतर पहिल्यांदाच टाकळीभान मध्ये आले असता टाकळीभान मधील 1998 सालचा दहावीच्या वर्ग मित्रांकडून त्यांचे जंगी स्वागत व सत्कार करण्यात आला .
          मेजर माळी यांनी रयत शिक्षण संस्थेच्या अहिल्याबाई होळकर वस्तीगृहात राहुल आपले पाचवी ते दहावी शिक्षण टाकळीभान मध्ये पूर्ण गेले 1998 साली आपले शिक्षण पूर्ण करून गावी गेलेल्या ज्ञानेश्वर माळी यांनी देश सेवेत सामील होण्याचा निर्णय घेतल्यानंतर मित्र परिवारात तब्बल 28 वर्षानंतर मित्र परिवाराची भेट झाली यावेळी एक वेगळाच आनंद त्यांच्या चेहऱ्यावर व मित्र परिवाराचे चेहऱ्यावर दिसून येत होता त्या स्वागता वेळी त्यांचे आई-वडील मुलं बहीण असा परिवार सोबत होता मित्रपरिवारच प्रेम पाहून एवढ्या वर्षानंतर भेटून सुद्धा मी प्रेम तसंच पाहून आई-वडिलांच्या डोळ्यात सुद्धा अश्रू खुळखळून वाव लागले 
           सत्कारावेळी बापूसाहेब नवले यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत देश सेवा करत असताना या शूरवीरांची कहाणी सांगत असताना मेजर माळी यांच्या आई-वडिलांच्या डोळ्यातून पाण्याच्या दारावर लागल्या मुलासोबत आई-वडिलांचा ही सन्मान केल्याबद्दल मेजर माळी यांनी सर्व मित्र परिवारांचे धन्यवाद व्यक्त केले 
             यावेळी उपसरपंच कानोबा खंडागळे विजय त्रिभुवन नितीन बनकर भाऊसाहेब पवार उमेश त्रिभुवन श्रीकृष्ण वेताळ पंकज पटारे दत्तात्रय बोरगे धनंजय पवार गणेश कोकणे एकनाथ पठारे बापूसाहेब नवले वस्तीगृह अधीक्षक पदी मित्रपरिवार यावेळी उपस्थित होते,

Comments

Popular posts from this blog

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध