वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर
टाकळीभान (प्रतिनिधी) वृक्षरोपणा बरोबरच तितकेच वृक्षांचे संगोपन व संवर्धन करणे महत्त्वाचे असून ती आपली नैतिक जबाबदारी असल्याचे प्रतिपादन निसर्ग व पर्यावरण मंडळाचे राज्य उपाध्यक्ष व मा.मुख्याध्यापक डॉ. अनिल लोखंडे सर यांनी केले. टाकळीभान येथील जिल्हा परिषद वस्ती शाळा दाभाडे वस्ती येथे निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळ व भारतीय आयुर्विमा महामंडळ (एल.आय.सी.) यांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षारोपण संपन्न झाले.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अनिल लोखंडे बोलत होते. त्याचप्रमाणे यावेळी प्रमुख पाहुणे श्रीरामपूर एल.आय.सी. शाखेचे शाखाधिकारी नामदेव कानडे तसेच याप्रसंगी डॉ अनिल लोखंडे बोलताना म्हणाले की प्रत्येकाने आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वृक्षारोपण केल्यास आपल्या देशाची लोकसंख्या १४० कोटी असून यातील मोठ्या संख्येने जन-सहभागातून मोठी चळवळ ऊभी राहून प्रत्येकाने वृक्षारोपण केल्यास शासनाचे वृक्षारोपण बाबतचे उद्दिष्ट साध्य होण्यासाठी मदत होऊन पर्यावरणाचा समतोल राखण्यास मदत होणार असल्याचे ते म्हणाले.
यावेळी विद्यार्थ्यांना पर्यावरणाबद्दल जनजागृती विद्यार्थी दशेपासून करणे गरजेचे असून त्यांनी वृक्षारोपण केलेल्या झाडांचे काळजीपूर्वक संगोपन संवर्धन करण्याचे देखील आवाहन त्यांनी केले व पर्यावरणाविषयी माहिती विशद केली
याप्रसंगी श्रीरामपूर एल.आय.सी.शाखाधिकारी नामदेव कानडे, माजी उपसरपंच राजेंद्र कोकणे, अनिल बोडखे, केंद्रप्रमुख वाघ सर आदींनी पर्यावरणाचे महत्त्व विशद करून कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांनी पर्यावरण मंडळाचे जिल्हा संघटक अर्जुन राऊत यांच्या कार्याचे कौतुक करून अभिनंदन केले.याप्रसंगी टाकळीभान तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या शुभहस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
पर्यावरण मंडळाचे जिल्हा संघटक अर्जुन राऊत व शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष विठ्ठल दाभाडे यांच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रम प्रसंगी, राष्ट्रवादी किसान सेनेचे तालुका उपाध्यक्ष बंडोपत बोडखे , प्राध्यापक जय मगर, तंटामुक्तीचे अध्यक्ष आबासाहेब रणनवरे ,माजी उपसरपंच राजेंद्र पा कोकणे, विलास दाभाडे , तंटामुक्तीचे उपाध्यक्ष अनिल दाभाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विठ्ठल दाभाडे,, अनिल बोडखे,प्रकाश दाभाडे, मेजर पोपटराव दाभाडे, भैय्या पठाण, केंद्रप्रमुख वाघ सर,मोहन रणनवरे, बांधकाम कामगार नेते प्रताप लोखंडे, आदी मान्यवर उपस्थित होते. सुजित बोडखे ,भाऊसाहेब गव्हाणे, अरविंद साळवे, अरुण रणनवरे,मुख्याध्यापिका अवचट मॅडम, वारे मॅडम, बनकर ताई आदींसह गावातील मान्यवर, पदाधिकारी ,ग्रामस्थ, केंद्रप्रमुख,मुख्याध्यापक , शिक्षक वृंद मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन अर्जुन राऊत यांनी केले,
Comments
Post a Comment