जेन झी आणि त्यांच्या समस्या

कविता..

आज वयाच्या १३ ते २८ या गटात असणाऱ्या मुलांना/तरुणांना जेन झी म्हणजेच जनरेशन झेडमध्ये गणलं जातं.

या वयातले तरुण वेगळ्याच वैश्विक वातावरणात वाढले आहेत. त्यांच्या लहान वयापासूनच त्यांना अनेक चॅनेल्स असलेले टीव्ही, लहान वयात स्वतंत्र मोबाईल, शिक्षणाच्या सुरुवातीपासून इंटरनेटचा वापर या तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे फायदे मिळाले आहेत. त्याचा त्यांना निश्चितपणे फायदा झाला आहेच.
या वयातल्या तरुणांचे प्रश्न वेगळे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे त्यांची मानसिकता. ही पिढी कुणाचंच ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. शाळा आवडली नाही तर त्या शाळेत जात नाहीत. कॉलेजला ॲडमिशन घेतली पण कॉलेजमध्ये मन रमलं नाही, हे सरळ मला नाही आवडलं सांगून मोकळे होतात.

ही मुलं कंपनीमध्ये किंवा कामाच्या ठिकाणी जास्त काळ टिकू शकत नाहीत. त्यामुळे ६ पेक्षा जास्त देशांनी या वयोगटातल्या लोकांना कामावरच न घेण्याचा निर्णय घेतला आहे. हे खरोखर धक्कादायक आहे. यामागच्या कारणांचा विचार केला तर जेन झीमधले लोक प्रोफेशनलिझम, मोटिव्हेशन, वर्कएथिक्स आणि कम्युनिकेशन या सगळ्यांमध्ये मार खातात असं दिसतं.
अनेक कंपन्यांच्या मुख्याधिकाऱ्यांकडूनही हाच बॉंब ऐकायला येतो. ती म्हणजे कंपनीत मुलांना कामापेक्षा पर्पज आणि फायदे जास्त हवे असतात. इतर वेळी ठीक आहे पण जेव्हा एखादा प्रोजेक्ट डिलिव्हर करण्याची वेळ येते तेव्हा पण ही मंडळी माझी कामाची वेळ संपली, मी चाललो किंवा मी चालले असं म्हणून चालू लागतात. तेव्हा कंपनीमधल्या इतर जबाबदार मंडळींना हातावेगळी कामं करून डिलिव्हर करावं लागतं.
आता यात चूक कोणाची यावर चर्चा करण्यात अर्थ नसतो. पण कंपनी आपली आहे. आपली कामं वेळेवर पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे. ती वेळेवर पूर्ण करावीत म्हणजे ओव्हरटाईम करावा लागणार नाही हे या जनरेशनला मान्यच नाही. मी चारच तास काम करणार, मी माझ्या घरी बसून काम करणार, मी जास्तीत जास्त सुट्ट्या घेणार, मी माझ्या कामाप्रती आणि मी जिथे काम करते/करतो आहे त्यांच्याशी काहीही भावनिक बंध ठेवणार नाही. कंपनीची प्रगतीचा आणि माझा काहीही संबंध नाही, असेच यांचे विचार फटकन असतात. असं असेल तर यांना कोण जबाबदारीचं पद देईल? कोणाला यांच्यावर त्यांचा प्रमोशन का द्यावं?
बरं हेही जाऊद्या, यावरचा उच्चांक म्हणजे नीट काम करत नसलेल्या एखाद्या मुलाला किंवा मुलीला कंपनीतून काढून टाकलं तर तो किंवा ती आपल्या मित्रांना किंवा मैत्रिणींनाही तिथली नोकरी सोडायला फितवतात!
म्हणजे ही मुलं स्वतःची पण प्रगती करत नाहीत आणि आपल्या सोबत आपल्या मित्रांनाही बेकारीच्या खाईत ढकलून जातात!

ही मानसिकता घेऊन कोण कसं पुढे जाईल तुम्हीच सांगा....?

— मनिषा गावडे
जि. प. प्रा. शाळा, प्रवरानगर
ता. राहाता, जि. अहिल्यानगर
मो. क्र. 9325819800

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध