बोखाडा वृक्षाच्या संवर्धनासाठी जिल्ह्यातील मासेमारांचा सकारात्मक प्रतिसाद, मासेमारी साठी या दुर्मिळ वृक्षाची फळे न वापरन्याचा निर्धार, डोंगरात रोपण ----



दिलीप शिंदे
सोयगाव दि.०५ - नदी, धरण व तत्सम जलाशयामध्ये मासेमार हे बोखाडा ज्यास मांजा असेही म्हटले जाते त्या झाडाची पक्व फळे भुकटी करून पाण्यात टाकतात,ज्यामुळे पाण्यातील मासे गुंगतात व पाण्यावर अर्धमेले होऊन तरंगतात,ज्यामुळे मासे पकडणे सहज सोपे होते. 

मासे जसे प्रभावित होतात तसे लहान सहान जल कीटक जे बगळे, वंचक, करकोचे आदी पाणपक्षी यांचे खाद्य असते ते ही यामुळे नष्ट होतात ही पण चिंतेची बाब होती.अजिंठा डोंगर रांगेत आता मोजक्या ठिकाणी ही झाडे शिल्लक आहेत. या झाडाची पक्व फळे मासेमारीसाठी वापरात आल्याने तीचा नैसर्गिक बीज प्रसार न झाल्याने ति निसर्गातून नष्ट होत आहे. सिल्लोड येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा सहकार्य व अभिनव प्रतिष्ठानचे वृक्ष संवर्धक डॉ. संतोष पाटील यांना ही दुर्मिळ प्रजाती अजिंठा डोंगरात ६ ते ७ ठिकाणी वनभ्यास करतांना आढळली आहे. या झाडाचे बीज संकलनाचा प्रयत्न करतांना ही फळे मासेमारीसाठी वापरतात हे माहित होते व तशी खात्री झाल्यावर त्यांनी या झाडाच्या नैसर्गिक बीज प्रसार व रोप निर्मिती बाबत ३ वर्षापासून कार्य सुरू केले. भोई समाजातील मित्र व खेळणा मासेमार सोसायटीचे कौतिक गवळी व सलीम पठाण बहुलीकर यांच्या माध्यमातून मासेमारांना ही फळे न वापरता इतर पारंपरिक पद्धतीने मासे पकडण्याचे सातत्याने प्रबोधन केले. अलीकडच्या २ वर्षात अजिंठा डोंगराच्या केळगाव च्या लगत कळसाई परिसरातून या वृक्षाची फळे मिळू लागली, ज्यामुळे रोप बनवने शक्य झाले व हीच रोपं याच डोंगरात १६ ठिकाणी खेळणा व वाघूर नदीच्या प्रवाह क्षेत्रा लगत लावण्यात आली. "बोखाडा" हा वृक्ष बहुधा डोंगराळ जमिनीत नदी,नाले या ठिकाणी निसर्गतः आढळून येतो.
------- सह्याद्रीत बोखाडा वृक्षाची भिन्न व काजव्यांचा अधिवास असणारी प्रजाती ----- यावर भंडारदरा परिसरात काजव्यांचाही अधिवास आढळला आहे. आपल्या जिल्ह्यात आढळणारी प्रजाती ही "कॅसेरिया टोमँटोसा" ही असून या वृक्षाची फळे थोडी विषारी असतात. आदिवासी जनजाती या झाडाच्या फांदीपासून कंगवा बनवतात. त्या कंगव्याने केस विंचरले की त्याच्या संपर्काने उवा, लिखा मरतात.     
        ------------ गुणधर्म विषारी पण जैवविविधतेत भूमिका महत्वाची-- या झाडाच्या पानांचा अर्क हा डेंग्यू ला कारणीभूत क्यूलेक्स व मलेरिया पसरवणाऱ्या डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी कीटकनाशक म्हणून वापरता येतो. कमांडर, कॉमन लेपर्ड , साईक, स्पॉटलेस ग्रास येलो या फुलपाखरांचा व " बेटॉयडेस आशियाटीस" या प्रजातीच्या पतंगांचा होस्ट प्लांट असल्याचे डॉ. संतोष जे. पाटील यांनी प्रतिनिधींशी बोलतांना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध