निंबायतीच्या ग्रामसभेत तास भर गोंधळ,ग्रामस्थांनी केला समस्या चा भडिमार, ग्रामसभा तहकूब----




दिलीप शिंदे 
सोयगाव, दि.२०--प्रधानमंत्री आवास प्लस योजनेची यादी वाचन सह इतर विषयावर दि.२० गुरुवारी आयोजित केलेली ग्रामसभा ग्रामस्थांनी केलेल्या समस्यांचा भडीमार मुळे ग्रामसभा तासाभरात गुंडाळून तहकूब झाली दरम्यान तरूणांनी ग्रामसभा हातात घेतल्या मुळे ग्रामसभा वादळी सुरू झाली होती तरुण आणि युवक आक्रमक झाल्याने ग्रामपंचायत ला कुलूप लावण्याच्या पवित्र्यात होते परंतु ग्रामसभेचे सचिव विस्तार अधिकारी अशोक दौड यांनी दि.३१ आगस्ट रोजी आयोजित ग्रामसभेत या समस्येवर उत्तर देण्याचे आश्वासन दिल्याने अखेर ग्रामस्थ शांत झाले होते.
निंबायती ग्रामपंचायतीची घरकुल योजनेचा लाभार्थी यादि वाचन सह इतर विषयावर प्रशासक विस्तार अधिकारी अशोक दौड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित केली होती या ग्रामसभेत चक्क एक हजार वर ग्रामस्थ उपस्थित होते संतप्त ग्रामस्थांनी १५ व्या वित्त आयोगाच्या निधी पासून काय विकास केला याचा लेखाजोखा ग्रामसभेत उपस्थित करण्याचा मुद्दा हाती घेतला परंतु यावर प्रशासक यांच्या कडे समाधान कारक उत्तर न मिळाल्याने ग्रामसभेत गोंधळ उडाला होता तासभर गोंधळ सूरू होता अखेर संतप्त ग्रामस्थांनी ग्रामपंचायतला कुलूप ठोकण्याच्या पवित्रा घेतला परंतु विस्तार अधिकारी अशोक दौड यांनी ही ग्रामसभा तहकूब करून पुढील (दि.३१) ग्रामसभा आयोजित करून या ग्रामसभेत उत्तर देण्याचे आश्वासन दिल्या मुळे ग्रामस्थ शांत झाले व अखेर ग्रामसभा तहकूब होऊन( दि.३१) ऑगस्ट रोजी ग्रामसभा नियोजित केली.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

सावळीविहीर बु.व पंचक्रोशीतून मोठ्या भक्तीमय वातावरणात हरिनाम सप्ताह स्थळी भाकरीचा प्रसाद करण्यात आला पोहच!