वृक्षारोपण, वृक्षदिंडी व शाखा पुस्तिका प्रकाशन कार्यक्रम उत्साहात संपन्न*
लोणी :- प्रतिनिधी ( रूपाली भालेराव ) रयत शिक्षण संस्थेचे प. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी येथे 'गुरुपौर्णिमा' निमित्त पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा वृक्षारोपण, वृक्षदिंडी व शाखा पुस्तिका प्रकाशन हा संयुक्त कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. संदीपजी वर्पे साहेब (मॅनेजिंग कौन्सिल सदस्य) होते. प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री किरण कडू पाटील (जनरल बॉडी सदस्य), मा. श्री विजय थोरात साहेब (अध्यक्ष, लायन्स क्लब शिर्डी), मा. श्री बाळासाहेब केरुनाथ विखे पाटील (सदस्य, स्थानिक स्कूल कमिटी), मा. श्री जनार्दन घोगरे पाटील (सरपंच, लोणी खुर्द) तसेच विद्यालयाचे प्राचार्य मा. श्री डहाळे एस. एस. उपस्थित होते.
यावेळी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर सेवकांनी वृक्षारोपण उपक्रमासाठी ₹२५,००० इतका निधी स्वखुशीने जमा केला. या सामाजिक बांधिलकीच्या कार्याचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक करत विद्यालयाच्या पर्यावरणपूरक उपक्रमाचे अभिनंदन केले.
वृक्षारोपण उपक्रम यशस्वी करण्यासाठी श्री अमोल कडू, श्री सिनारे जे. के., श्री पवार आर. सी., श्री अंत्रे के. आर. ,श्री लव्हारकर व श्री शेख यांनी विशेष सहकार्य केले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरण संवर्धनाची जनजागृती करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या वृक्षदिंडीच्या नियोजनात श्रीमती मडके एम. बी., श्रीमती दाभाडे एस. डी., श्री पोकळे एन. के., श्री गोंदके यू. आर.,श्री.वर्पे ,श्री शेख, श्रीमती खैरे ,श्रीम पोखरकर,श्रीम शेटे व श्रीमती गोंदके यांनी उल्लेखनीय परिश्रम घेतले.
विद्यालयाच्या शाखा पुस्तिकेच्या निर्मितीत श्री कुलथे पी. बी., श्री किरवे एस. एस., श्री.लोखंडे व श्री निर्मळ सर यांचे मोलाचे योगदान लाभले. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन श्री किरवे एस. एस. यांनी केले, तर ज्येष्ठ शिक्षक श्री सिनारे जे. के. यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पर्यावरण संवर्धन, सामाजिक उत्तरदायित्व आणि शैक्षणिक उपक्रमांचा सुंदर संगम साधणारा हा कार्यक्रम विद्यार्थी, पालक व उपस्थित मान्यवरांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीरीत्या पार पडला.
सहसंपादक - साबळे ज्ञानेश्वर
Comments
Post a Comment