शिवसेना राहाता तालुका पदाधिकाऱ्यांची शुक्रवारी महत्त्वपूर्ण बैठक
शिर्डी (प्रतिनिधी)- शिवसेना राहाता तालुका पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १०.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख संदीप रमेश विघे यांनी दिली आहे.
या बैठकीस शिवसेना जिल्हाप्रमुख सचिनभाऊ कोते पा. तसेच विधानसभा संपर्कप्रमुख श्री. सूर्यकांतजी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या बैठकीमध्ये पक्ष संघटन मजबूत करणे, आगामी काळातील पक्षाच्या कार्याची दिशा, तालुक्यातील संघटनात्मक बाबी तसेच विविध महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.व संपर्कप्रमुख सूर्यकांतजी शिंदे हे मार्गदर्शन करणार आहेत.
तरी राहाता तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांनी या बैठकीस वेळेत उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.हि
बैठक शिवसेना (उबाठा )राहाता तालुका कार्यालय सावळीविहीर फाटा,ता.राहाता, जि. अहिल्यानगर येथे शुक्रवार दि. २१/०८/२०२६ रोजी सकाळी ठीक १०.३० वा. होणार आहे.तरी सर्व शिवसैनिकांनी या बैठकीला न चुकता उपस्थित रहावे .असे आवाहन उपजिल्हाप्रमुख नानाभाऊ बावके व तालुकाप्रमुख संदीप रमेश विघे यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.
Comments
Post a Comment