सावळीविहीर बुद्रुकच्या कारवाडी येथील श्री लक्ष्मीआईची यात्रा नुकतीच उत्साहात संपन्न!

शिर्डी (प्रतिनिधी)-
राहाता तालुक्यातील सावळीविहीर बुद्रुकच्या कारवाडी येथील श्री लक्ष्मीआईची यात्रा नुकतीच मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रमांनी संपन्न झाली. 

  दरवर्षीप्रमाणे यावर्षीही आषाढ महिन्यातल्या तिसऱ्या मंगळवारी ही श्री लक्ष्मी आईची यात्रा भरवली जाते. यावर्षी चार ऑगस्ट 2026 रोजी श्री लक्ष्मी आईची यात्रा भरवली गेली. या यात्रेच्या दिवशी येथील तरुणांनी श्रीक्षेत्र वणी येथील सप्तशृंगी गडावरुन ज्योत आणली होती.तसेच गोदाजल आणत वाजत गाजत मिरवणूक गावातून काढत पहाटे श्री लक्ष्मीआईला या पायी आणलेल्या गोदाजलाने स्नान घातले. त्यानंतर अभिषेक, पूजा आरती झाली.येथे दिवसभर भाविकांची विशेषतः महिलांची दर्शनासाठी वर्दळ होती. सायंकाळी‌ हभप अर्जुन चौधरी महाराज यांचे जाहीर हरी किर्तन झाले. कीर्तनकार ह भ प चौधरी महाराज यांचा सत्कार करण्यात आला. किर्तन झाल्यानंतर महाआरती झाली. किर्तन झाल्यानंतर ह भ प चौधरी महाराज यांच्या हस्ते विविध मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कीर्तनानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला. यात्रेनिमित्त येथील मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोशनाई करण्यात आली होती. येथे दर्शन ,कीर्तन व महाप्रसादाला मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. यात्रा यशस्वी करण्यासाठी येथील तरुण मंडळ, सावळीविहीर बुद्रुक कारवाडी ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध