द फेस ऑफ महाराष्ट्र - २०२६ मध्ये वैजापूर ची प्रियंका रमेश वाघ यांची फॅशन शो मध्ये उत्कृष्ट कामगिरी

लोणी ( प्रतिनिधी)

  कोपरगाव येथे सुनिल पाटील फिल्म प्रॉडक्शन यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'द फेस ऑफ महाराष्ट्र-२०२६' या राज्यस्तरीय फॅशन शो स्पर्धेत वैजापूर येथील ' प्रियंका रमेश वाघ ' हिने उत्कृष्ट सादरीकरणाच्या

जोरावर पहिला क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश संपादन केले. राज्यातील विविध भागांतून सुमारे ८० स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले होते. अनेक फेऱ्यांतील स्पर्धेत प्रियंका आत्मविश्वासपूर्ण रॅम्पवॉक, आकर्षक व्यक्तिमत्त्व आणि प्रभावी सादरीकरणाच्या बळावर प्रेक्षकांचे मने जिंकत विजेतेपदावर आपले नाव कोरले.
या कार्यक्रमाचे आयोजक सिनेअभिनेते सुनिल पाटील सर .करिष्मा हलवाई ज्येष्ठअभिनेते विजय पाटकर सर
यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अभिनेत्री आंचल चव्हाण, अभिनेते अर्जुन आंबेकर (आरजे), लेखक वैभव ढुस सामाजिक .साऊथ ऍक्टर KGF फिल्म .गरुडा .
सईताईभराट . प्रशांत कुंहिले सर यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांचा गौरवकरण्यात आला. प्रियंका तिच्या या यशामुळे वाघ कुटुंबासह वैजापूर शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रियंका वाघ याचे यशाबद्दल शुभेच्छा यावेळी व्यक्त करण्यात आल्या. फॅशन शो आणि व्यक्तिमत्त्व विकास क्षेत्रातील हे यश वैजापूर साठी अभिमानास्पद मानले जात असून, भविष्यात प्रियंका वाघ राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरी करेल, असा विश्वास सुनिल पाटील सर व शुभेच्छुकांनी व्यक्त केला आहे.

Comments

Popular posts from this blog

देश सेवेतून सेवा निवृत्त झाले ,मेजर माळी यांचे मित्र परिवाराकडून जंगी स्वागत

वृक्षारोपण करून वृक्षांचे संगोपन करणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी व काळाची गरज - ह. भ. प. डॉ. अनिल लोखंडे सर

लक्षावधी वर्ष पुरातन ,जागतिक वारसा व सह्याद्रीची उपरांग असलेल्या अजिंठा डोंगराचे लचके तोडण्यास सुरुवात, ग्रीनको व मेगा इंजीनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर या जलविद्युत वीज निर्मिती प्रकल्पामुळे पर्यावरणीय संतुलन ढासळणार, वडोद (विठ्ठलाचे ) येथे बैठकीत गावकऱ्यांचा एकजुटीने विरोध