ख्रिस्ती समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील --- अभिजित दिपके
अनिल भोसले
संगमनेर -- ख्रिस्ती समाजाच्या धर्मांतर कायदेविषयक लढ्यात ख्रिस्ती समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असे प्रतिपादन कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी केले .
गेल्या महिन्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षा शिक्षणातील त्रुटी संदर्भात कोकरोच जनता पार्टीने केलेले दिल्ली येथील शांततापूर्वक आंदोलन आणि त्याला मिळालेले यश या पार्श्वभूमीवर आखिल भारतीय ख्रिशन फोरमच्या वतीने कोकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांची त्यांच्या छत्रपती शिवाजीनगर या निवासस्थानी भेट घेऊन फोरमच्या वतीने सहसंचालक अनिल भोसले व पदाधिकाऱ्यांनी त्यांचे कृतज्ञतापूर्वक अभिनंदन करून सन्मान करण्यात आला. यावेळी झालेल्या चर्चे दरम्यान ते बोलत होते.
अभिजित दिपके यांना फोरमच्या वतीने धर्मांतर कायद्याविषयीचे निवेदन देऊन त्यांनी निवेदन स्वीकारून या विषयाच्या संदर्भात अखिल भारतीय ख्रिशन फोरमच्या लढ्यात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दिपके यांच्याशी झालेल्या चर्चेत ख्रिस्ती समाज हा सामाजिक शांततेचा पुरस्कार करणारा समाज आहे परंतु सद्य राजकीय स्थितीत या समाजाला व्यथित करण्याचे काम जाणीवपूर्वक केले जाते नुकतेच केंद्र सरकारने धर्म सुरक्षा कायदा या गोंडस नावाखाली संविधानाने दिलेल्या धर्मविषयक अधिकाराचे पूर्णता हनन केलेले आहे जाणीवपूर्वक त्या अधिकारास. मुठमाती देण्याचाच हा प्रकार आहे .
शांततापूर्वक जगणाऱ्या ख्रिस्ती समाजाच्या लढ्यात देखील आपण सहकार्याचा हात पुढे करून संबंधित कायदा रद्द करण्यासाठी च्या लढ्यात पुढे यावे अशी मागणी चर्चेअंती करण्यात आली यावेळी दिपके यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
यावेळी मराठवाडा विभागाचे हेमंत बरसे, राजेश वाडेकर, अशोक गायकवाड, विजय निकाळजे आदीसह पदाधिकारी उपस्थित होते.
Comments
Post a Comment